सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे आयुर्वेदिक व वनौषधी वनस्पती उद्यानाच्या लागवडीचा शुभारंभ पर्यटन महासंचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर व जुन्नर वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक अमोल भिसे यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे, रंगनाथ स्वामी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायकराव आहेर, ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष शेठ हाडवळे, दत्ताशेठ हाडवळे, अनंथा आहेर सर, रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले, प्रा.दिनेश जाधव आदि उपस्थित होते.
समर्थ शैक्षणिक संकुलातील या आयुर्वेदिक उद्यानामध्ये २०० दुर्मिळ आयुर्वेदिक व वनऔषधी वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अक्कलकाढा, अडुळसा, आंबेहळद, आले, लसूण, गुळवेल, जेष्ठमध, उंबर, पान फुटी, देशीगुलाब, वेखंड, वाळा,मोगरा, अर्जुन, दालचिनी, जास्वंद, निरगुडी, तुळस, अशोक,किडामार, सागरगोटी, गुडमार,काळी मुसळी, डिकमली, शिकेकाई, माईन मुळा, रिठा, ब्राम्ही यांसारख्या औषधी वनस्पतींचा समावेश करण्यात आलेला आहे.
पर्यटन महासंचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर म्हणाल्या की, आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जगभरातून माणसे भारतात येत असतात. आयुर्वेद हि भारताने जगाला दिलेली देणगी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका हा अतिशय सजग म्हणून ओळखला जातो कारण पर्यटन साक्षरता ही जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जुन्नर हा नुकताच पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जुन्नरमध्ये पर्यटन साक्षरता आणि शोधक वृत्ती या दोन्हींचा अनोखा संगम दिसून येतो. गावाबाबतीत ऋण फेडण्यासाठी उत्तम संधी कृषी पर्यटनाच्या अनेकविध योजनेच्या माध्यमातून उपलब्ध असून त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे यावेळी सुप्रिया करमरकर म्हणाल्या.
अमोल भिसे म्हणाले कि, दुर्मिळ वनौषधी व वनस्पती यांची लागवड करून संगोपन करणे ही प्रक्रिया महाविद्यालयाने सुरू केलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे.
जितेंद्र देशमुख व राहुल पातूरकर यांनी साहसी पर्यटन व संभाव्य धोके याबाबत मार्गदर्शन केले. राजकुमार डोंगरे यांनी वैविद्यपूर्ण वनस्पतींची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश मस्करे यांनी प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार प्रा.प्रदिप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS