मंचर (पुणे): आंबेगाव (जि. पुणे) तालुक्याच्या पूर्व भागात भुरटया चोरांचा सुळसुळाट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच महिन्...
मंचर (पुणे): आंबेगाव (जि. पुणे) तालुक्याच्या पूर्व भागात भुरटया चोरांचा सुळसुळाट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच महिन्यापूर्वीच मांदळेवाडी व ढगेवाडी येथील बंद बंगले चोरटयोनी फोडल्याच्या घटनेचा अजून तपास लागला नाही.
तोच आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी (ता. १८) पहाटे अंदाजे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास मांदळेवाडी (ता. आंबेगाव ) येथे तीन घरे फोडून चोरट्यांनी अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.
मांदळेवाडी येथील मंदा आनंदा आदक यांच्या घराचा दरवाजा उघडून ३५०० रुपये व त्यांच्या गळयातील व घरातील कपाटातील साडेतीन तोळे सोने चोरट्यांनी पळवले. कपाटातील कपडे अस्ताविस्त पांगविले विशेष म्हणजे मंदा आदक झोपेत असताना चोरटे घरात शिरले व गळ्यातील सोन्याचा दागिना कापून घेतला. सकाळी त्या उठल्या तेव्हा कपाटातील कपडे अस्ताविस्त पडलेले पाहिले तेव्हा त्यांच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरीला गेल्याचे त्यांना समजले.
मंगल बगाटे-गाडगे यांच्या दरवाजाचे कडीकोंडया तोडून घरातील स्व:ताचे व बचत गटाचे असे १६०००/ रुपये व दिडग्रॅम सोने, चांदीचे जांझरे-पैजन पाच जोड चोरट्यांनी चोरून नेले. तसेच वसंत नामदेव आदक यांच्या दरवाज्याचे व शेप्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपडे इकडे-तिकडे पसरविले. मात्र ते भोसरी या ठिकाणी राहात असल्याने त्यांचे नेमकी काय चोरीला गेले हे समजले नाही. अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला. या संदर्भात चोरीच्या घटनेची खबर मिळताच पोलिस पाटील काळूराम पालेकर पाटील यांनी घटना स्थळी भेट देऊन पोलिसांना खबर दिली.
पारगाव पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस हवालदार रमेश इचके व व्ही.सी.पोखरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील काळूराम पालेकर पाटील, सरपंच कोंडीभाऊ आदक,माजी सरपंच बापू आदक, भाऊसाहेब बगाटे, अँड.सोनभाऊ आदक, रविंद्र आदक, सुभाष बोत्रे, ज्ञानेश्वर मांदळे, बाबाजी आदक, विलास आदक, संजय आदक व ग्रामस्थ उपस्थित होते.
अंदाजे चोरटे तीन चार जण होते व ते मोटार सायकलवर आले होते. असा प्राथामिक अंदाज आहे. येथील ग्रामपंचायतीचे सीसीटिव्ही फूटेज तपासले पण त्यामध्ये काहीच दिसून आले नाही. गु. र. नं.३१/२०२३भा. द. वि. क ४५७,३८० प्रमाणे पारगाव( कारखाना) पोलिस स्टेशन सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक जढर पुढील तपास करत आहे.
COMMENTS