सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) >हे प्रदर्शन म्हणजे नावीन्यपूर्ण प्रकल्पांची नांदी:डॉ.जे के सोळंकी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ख...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
>हे प्रदर्शन म्हणजे नावीन्यपूर्ण प्रकल्पांची नांदी:डॉ.जे के सोळंकी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील दरवर्षी होणारे विज्ञान प्रदर्शन एनसीआरए-जीएमआरटी ने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ नॉलेज (आय.आय.के.) या संस्थेच्या साहाय्याने ग्रोइंग डॉट या मोबाइल ऍप च्या माध्यमातून ऑनलाइन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे आयोजित केले होते.
खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागांमध्ये शिकत असलेल्या पायल फुटाणे व निकिता फापाळे या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या 'आय ओ टी बेस्ड ड्रिप इरिगेशन सिस्टीम' या प्रकल्पाचा बीई, एमई, एम एस्सी या गटामध्ये तृतीय क्रमांक आल्याची माहिती प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली. या विद्यार्थ्यांना प्रा.दिपाली गडगे यांनी मार्गदर्शन केले.
समर्थ पॉलिटेक्निक च्या आयुष राक्षे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'केबल ऑपरेटर डाटाबेस अनालिसिस' या प्रकल्पास बी एस्सी, बीसीएस, डिप्लोमा या गटात तृतीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली. प्रा.स्वप्निल नवले यांनी मार्गदर्शन केले.
समर्थ गुरुकुल बेल्हे च्या समर्थ विवेक शेळके या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'इलेक्ट्रिसिटी जनरेशन बाय युजिंग एअर प्रेशर ऑफ मुव्हिंग व्हेईकल' अर्थात 'समृद्धी महामार्ग रचना' या प्रकल्पास ८ वी ते १० वी या गटामध्ये द्वितीय क्रमांक तर प्रणव कडूस्कर या विद्यार्थ्याने तयार केलेल्या 'ऑटोमॅटिक रूम लाईट कंट्रोलर' या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याची माहिती प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण एनसीआरए चे संचालक प्रो.यशवंत गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी डॉ.जे.के.सोळंकी, प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांच्या उपस्थितीत झाले.
या वर्षी अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प आणि संकल्पना या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाल्याचे जी एम आर टी चे वरिष्ठ अधिकारी डॉ.जे के सोळंकी यांनी सांगितले.
सदरच्या विज्ञान प्रदर्शनात पुणे, मुंबई, नगर, नाशिक ठाणे या भागातील ३६० शाळा महाविद्यालयांनी सहभाग घेऊन सुमारे ८५० विविध प्रयोग व प्रकल्प सादर झाले. या प्रकल्पांसोबत जवळजवळ साडे तेवीस हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी नवनवीन समाजाभिमुख प्रकल्प तयार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS