जयपूर (राजस्थान) : दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध जुळले होते. पण, यावरून घरात भांडण सुरू झाल्यानंतर दोघांनी दुचाकीवरून घरातून बाहेर जाण्याचा निर...
जयपूर (राजस्थान) : दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध जुळले होते. पण, यावरून घरात भांडण सुरू झाल्यानंतर दोघांनी दुचाकीवरून घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पण, काही वेळातच त्यांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सुरतगड परिसरात राहात असलेल्या दीराचे (वय २०) आणि वहिनीचे (वय ३८) प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांच्या प्रेमप्रकरणांबद्दल घरात माहिती समजल्यानंतर जोरदार भांडण सुरू होते. अखेर, दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. दोघे दुचाकीवरून घराबाहेर पडले आणि सूरतगड-हनुमानगड रेल्वे ट्रॅकसमोर उडी मारत आपले जीवन संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर पृथ्वीराज मेघवाल आणि वहिनी सुनीता मनसाराम मेघवाल अशी मृतांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह सुरतगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले होते. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
COMMENTS