संगमनेर (अहमदनगर): दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये तीन युवक जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
संगमनेर (अहमदनगर): दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये तीन युवक जागीच ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संगमनेर-अकोले रस्त्यावरील मंगळापूर जवळ शुक्रवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संगमनेर-अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला ताब्यात घेतले आहे.
ऋषीकेश हासे (वय 20 ), सुयोग हासे (वय 20), निलेश सिनारे (वय 26) अशी या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS