पुणे : पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्याच पेटवल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. आगीमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाण...
पुणे : पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्याच पेटवल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. आगीमध्ये गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी (ता.13) पहाटे 5 वाजता हा प्रकार घडला आहे.
टेरेन्स डॉमिनिक जॉन याने लावलेल्या आगमध्ये 4 दुचाकी, 1 चार चाकी आणि एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. काही गाड्या जळून खाक झाल्या आहेत तर इतर गाड्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गाड्या पेटवल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्याविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला. पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको, असे सांगितले होते. पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यामुळे चिडलेल्या जॉनने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले. यावेळी पार्किंगमध्ये असलेल्या इतर दुचाकींसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. पोलिसांनी टेरेन्सला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.
पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे टेरेन्सचा राग अनावर झाला. त्याने आपल्याच पत्नीची गाडी पेटवण्याचे ठरवले आणि गाडी पेटवली. त्यानंतर पुन्हा राग आल्याने त्याने पार्किंगमधील इतरांच्या गाड्याही पेटवल्या. यामुळे सोसायटीतील अनेकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
COMMENTS