सहसंपादक:-प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live खानापूर : येथील शिवनेरी फार्मसी महाविद्यालयामध्ये दिनांक २ मार्च रोजी पाचवी राज्यस्तरी...
सहसंपादक:-प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live खानापूर : येथील शिवनेरी फार्मसी महाविद्यालयामध्ये दिनांक २ मार्च रोजी पाचवी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली, या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 22 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये अनुक्रमे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर यांनी प्रथम , रसिकलाल माणिकचंद धारीवाल कॉलेज ऑफ फार्मसी, चिंचवड यांनी द्वितीय , व शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, खानापूर, यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून डॉ. अमोल शहा,प्राचार्य सीताबाई थिटे कॉ.ऑफ फार्मसी शिरूर व सह पर्यवेक्षक डॉ.सुमित जोशी ,शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर व सौ. रेश्मा लोंढे , विशाल जुन्नर सेवा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी आळे यांनी यशस्वीरीत्या काम पार पाडले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. चंद्रकांत कणसे, अध्यक्षा डॉ.सौ.सरस्वती कणसे, सचिव श्री.शुभंकर कणसे, सी.ई.ओ. सौ.श्रद्धा कणसे, कॅम्पस इन चार्ज श्री.राजेंद्र मुरादे, प्रशासकीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर पटाडे, आय.टी. आय चे प्राचार्य श्री.राजेंद्र आंधळे, प्राचार्य श्री.संजय मिश्रा, फार्मसीचे प्राचार्य श्री.सचिन नागदेवे,आय टी विभागप्रमुख श्री. अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. प्रतीक्षा बिडवाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. वैभव वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
COMMENTS