बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर भागात एक अजब घटना घडली. येथील एका चप्पल दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानकपणे सुरु झाला अन् काही सेकंदात...
बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर भागात एक अजब घटना घडली. येथील एका चप्पल दुकानाबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर अचानकपणे सुरु झाला अन् काही सेकंदात दुकानाचे काचेचे तावदान भेदून तडक दुकानात घुसला.
या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, हा अजब प्रकार पाहण्यासाठी दुकानाबाहेर बघ्यांची गर्दी झाली होती.
घडलेली घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
ही अजब घटना मंगळवारी सायंकाळी कोतवाली शहर पोलिस ठाण्यासमोर घडली. या पोलिस ठाण्यात समाधान दिनानिमित्त नागरिकांची ये-जा सुरू होती. येथे काहीजण दुचाकी, चारचाकी तसेच ट्रॅक्टर घेऊन आले होते. दरम्यान, किशन कुमार नावाच्या एका व्यक्तीने ट्रॅक्टर चप्पल शोरूमबाहेर उभा करून तो पोलिस ठाण्यात गेला. सुमारे एक तास तो ठाण्यामध्येच होता.
दरम्यान, सुमारे तासाभराच्या अंतराने शोरूमसमोर उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि समोर उभ्या असलेल्या सायकल आणि दुचाकीला उडवत शोरूमच्या काचेच्या गेटमधून आत घुसला. ही संपूर्ण घटना शोरूममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
ट्रॅक्टर दुकानात शिरत असल्याचे पाहून शोरूममधील काउंटरवर बसलेल्या तरुणाने तत्काळ हालचाल करत ट्रॅक्टर नियंत्रित केला. त्यानंतर मालकाचा शोध सुरू झाला. यामुळे जिवितहानी टळली. मात्र, या अजब प्रकाराची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती.
COMMENTS