सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) जुन्नर - स्पर्धेचे युगात गुणवत्ता टिकवण्यासाठी मुलांची खूप धावपळ होते, त्यावेळी आहार, विहार, व्यायाम याक...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
जुन्नर - स्पर्धेचे युगात गुणवत्ता टिकवण्यासाठी मुलांची खूप धावपळ होते, त्यावेळी आहार, विहार, व्यायाम याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आपोआप फास्ट फुड कडे मुले आकर्षित होतात. त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. भविष्यात अनेक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विशेषता किशोरवयीन मुला- मुलींनी शरीरात होणाऱ्या बदलांचा विचार करून शारीरिक आरोग्य जपावे, त्याचबरोबर मोबाईल, टीव्ही अशा साधनांपासून थोडं दूर राहवं असे आवाहन हिवरे तर्फे नारायणगाव येथे मुलांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समुपदेशक अनुष्का शिंदे यांनी केले. कुलस्वामी खंडेराय विद्यालयात गुरुदक्षिणा सोशल वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन प्रदान कार्यक्रमात डॉ.शिंदे पुढे म्हणाल्या की शाळा हे एक कुटुंब आहे, मुला - मुलींनी अभ्यासाकडे लक्ष जास्त द्यावं, शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन स्वतःबरोबर शाळा, गाव, आई-वडील त्यांचं नाव उज्वल करावे.
याप्रसंगी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रविण शिंदे, श्रीब्रह्मनाथ विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक एफ. बी.आतार, गुरुदक्षिणा सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष संदीप पानसरे, डॉ.अनुष्का शिंदे, ज्येष्ठ शिक्षक अशोक चौधरी सहकारी वृंद, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चौधरी यांनी तर आभार भगवान काशीद यांनी व्यक्त केले.
--------------------------------
प्रतिक्रिया
सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन शाळेला मिळाल्याबद्दल धन्यवाद. ग्रामीण भागात वर्गात असताना मासिक पाळी आल्यास लगेच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नाही. अशावेळी या मशीनच्या माध्यमातून मुलींना लगेच उपलब्ध होतील.गैरहजर वा लगेच घरी जाणे याला प्रतिबंध घालता येईल. ग्रामीण भागाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयोगी आहे.
सौ.विद्या सिकेतोड ज्येष्ठ उपशिक्षिका
----------------------------------
COMMENTS