आरोग्य टिप्स - हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये याकडे लक्ष देणे गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाळी महत्...
आरोग्य
टिप्स - हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू नये याकडे लक्ष देणे
गरजेचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी डाळी महत्वाची भूमिका बजावतात.
जणूं घ्या कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा
–
हरभरा
डाळ
हरभरा
डाळीत असणारे फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. हरभरा
डाळीच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करता येते.
उडीद डाळ शरीराला लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांसारखे आवश्यक पोषक तत्त्वे पुरवते. तसेच उडदाची डाळ शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकते. या डाळीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडेही मजबूत होतात.
मुगडाळ
मुगडाळ हृदय मजबूत बनविण्यासाठी मदत करते. शरीराला आवश्यक पोषक तत्वे देते.तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते.
मसूरडाळ
मसूराच्या
डाळीत प्रोटीन्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, फोलेट, फायबर यांसारखे पोषक घटक
आढळतात. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर देखील नियंत्रित करण्यास मदत होते.
COMMENTS