आरोग्य टिप्स : उन्हाच्या झळा मागील काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. अशा दिवसात शरीरातील पाण्याची प...
आरोग्य टिप्स : उन्हाच्या झळा मागील काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. अशा दिवसात शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी थंड पदार्थ किंवा फळे अत्यंत उपयुक्त ठरतात. आता बाजारात पपई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पपईचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे ती उन्हाळ्यात खावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु पपईचे या दिवसात मर्यादित सेवन फायदेशीरच ठरते..ते कसे आपण जाणून घेऊयात…(benefits of eating papaya in summer)
उन्हाळ्यात पपईचे सेवन करता येते, मात्र ते मर्यादित स्वरुपात असावे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी असे शरीराला पोषक घटक असतात. उन्हाळ्यात मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा वाढते. या दरम्यान पपई खाल्याने या व्यक्तींना थोडा आराम मिळतो. याशिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)
COMMENTS