नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एका चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला. अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक दिली. यात ८ जण चि...
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात एका चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला. अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींना धडक दिली. यात ८ जण चिरडले गेले. यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेण्याआधी मृत्यू झाला. इतर तिघे गंभीर जखमी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगर कल्याण महामार्गावर लवणवाडीत इथे पिकअपने दोन दुचाकीसह आठ जणांना चिरडले. तीनही वाहने समोरासमोर धडकली. या अपघातात एका लहान मुलाचा आणि व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सहा जणांपैकी आणखी तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
COMMENTS