आरोग्य टिप्स - मनुष्याकडून होणारा मोबाईलचा अतिवापर त्याच्या हृदयास घातक ठरू लागला आहे ( mobile gaming) . नुकत्याच आलेल्या स्टेट ऑफ ऑनलाईन गे...
आरोग्य टिप्स - मनुष्याकडून होणारा मोबाईलचा अतिवापर त्याच्या हृदयास घातक ठरू लागला आहे (mobile gaming) . नुकत्याच आलेल्या स्टेट ऑफ ऑनलाईन गेमिंगच्या अहवालानुसार मोबाईलवर अधिक वेळ गेम खेळणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. या अहवालानुसार भारतीय गेमर्स एका आठवड्यात ऑनलाईन गेम खेळण्यासाठी सरासरी साडे आठ तास घालवतात. हे प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, मोबाईल गेमिंगमुळे माणसाचा तणाव वाढून त्याला रक्तदाबासंबंधित आजार जडू शकतात. फ्रंटियर्स इन सायकॉलॉजीतील संशोधनानुसार अधिक प्रमाणात गेम खेळल्याने आपल्या हृदयालाही धोका संभवतो. (heart disease) अति प्रमाणात गेम खेळल्याने काय गंभीर परिणाम होतात आपण पाहूयात…
डोळे खराब होणे (Effect on
Eyes)
गेम्स
खेळल्याने मोबाईल किंवा कॉम्पुटर स्क्रीनमुळे डोळे कोरडे पडतात. याशिवाय डोळ्यांचे
फडफडणे कमी होते व एकाग्रता भंग पावते. त्यामुळे डोळे लालसर होऊन जळजळ करतात.
यामुळे डोळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे होते.
मानसिकतेवर परिणाम (Depression)
गेमचे
व्यसन आरोग्याला धोकादायक ठरू शकते. दीर्घकाळ मोबाईलवर गेम खेळल्याने चिडचिड, एकटेपणा अशा तक्रारी होऊ
शकतात. गेमर त्यांच्या चिंता टाळण्यासाठी अधिक गेम खेळतात. मात्र, त्याच्या त्यांच्या
मानसिकतेवर आणि हृदयावर परिणाम होत असतो.
लठ्ठपणा वाढणे (obesity)
स्क्रीनसमोर
बराच वेळ बसून राहिल्याने स्थूलपणा येऊन लठ्ठपणा वाढतो. याचे कारण, शरीराची न होणारी हालचाल
असते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होते. अनेकदा गेमिंग दरम्यान गेमर भूक
नसतानाही काहीना काहीतरी खातात. त्यामुळे लठ्ठपणा अधिक वाढतो.
खांदे, मनका, पाठदुखी
जास्तवेळ
एकाच जागी गेम खेळत बसल्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊन खांदे, मान, मनका, पाठदुखी जडते. त्याचा
परिणाम शरीरातील स्नायूंवर होतो. शरीरावरील नियंत्रण सुटते. पचनाच्या समस्या
उद्भवतात.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित
ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)
COMMENTS