क्राईमनामा Live : वै. ह. भ. प. गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशिर्वादाने व वै. ह. भ. प. विठ्ठल बाबा मांडे यांचे मार्गदर्शनाखाली चालत आ...
क्राईमनामा Live : वै. ह. भ. प. गुरूवर्य कोंडाजीबाबा डेरे यांच्या आशिर्वादाने व वै. ह. भ. प. विठ्ठल बाबा मांडे यांचे मार्गदर्शनाखाली चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील मौजे सुराळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे बुधवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी अखंड हरिनाम सप्ताहाला सकाळी ठिक १० वाजता ह. भ. प. अण्णा महाराज गिरी यांच्या हस्ते विणापुजन करून सुरूवात करण्यात आली.
पहिल्या दिवसाची किर्तन सेवा ह. भ. प. दिलीप महाराज शिंदे ( मुंबई घाटकोपर ) यांची रात्री ९ ते ११ किर्तन सेवा संपन्न झाली.
दुसर्या दिवसाची गुरूवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ ह. भ. प. आदिनाथ महाराज जुन्नरकर ( खडकी पिंपळगाव ) यांची किर्तनसेवा पार पडली.
शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ ह. भ. प. केशव महाराज जगदाळे ( पारनेर ) यांची किर्तनसेवा संपन्न झाली.
शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी ९ ते ११ ह. भ. प. चंद्रकांत महाराज सुर्यवंशी ( बारामती ) यांची किर्तनसेवा संपन्न झाली.
रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह. भ. प. सुनिल महाराज झांबरे ( बीड आष्टी ) यांचे आध्यात्मिक किर्तन संपन्न झाले.
सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ९ ते ११ ह. भ. प. वैभव महाराज राक्षे ( देहू ) यांचे ९ ते ११ जाहिर हरिकिर्तन होणार आहे.
मंगळवारी दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ९ ते ११ ह. भ. प. नामदेव महाराज वाळके यांचे किर्तन होणार आहे.
बुधवारी दिनांक १ मार्च २०२३ रोजी सकाळी ९ ते ११ ह. भ. प. संतदास महाराज मनसूख यांचे काल्याचे जाहिर हरिकिर्तन होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या सप्ताहाला आवर्जून उपस्थित राहून या नामसंकिर्तनाचा लाभ घ्यावा अशी सुराळे ग्रामस्थांची आग्रहाची विनंती आहे.
COMMENTS