सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या निरगुडे गावामध्ये सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे ह...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या निरगुडे गावामध्ये सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे हनुमान मंदिर आहे या मंदिरामध्ये शिवलिंग आशीर्वाद देणारी महारुद्र हनुमानाची मूर्ती व गणपतीची मूर्ती अशा तीन मूर्ती असल्याची माहिती श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांनी दिली
महाराष्ट्रात किंबहुना भारतात कुठेही असा किरणोत्सव अभिषेक वर्षातून तीन वेगवेगळ्या मूर्तींवर एकाच मंदिरात पाहायला मिळत नसावा असा दुर्मिळ आणि अलौकिक सूर्यकिरणोत्सव सोहळा जुन्नर तालुक्यातील निरगुडे या गावातील हनुमान मंदिरात पहावयास मिळत आहे मंदिरातील तीन मुर्तिंवर वर्षातुन तीन वेगवेगळया तीन देवतेंवर तीन वेळा किरणोत्सवाभिषेक पहायला मिळतो.
निरगुडे येथील हनुमान मंदिरास क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे महाराष्ट्रातील हे ऐतिहासिक मारुती मंदिर असून महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 7.05 ते 8:32 या वेळेत शिवलिंगावर किरणोत्सो अभिषेक पाहायला मिळतो तसेच हनुमान जयंतीला मारूतीच्या मुर्तिवर सुर्य मावळतीच्या किरणांचा किरणोत्सवाभिषेक पहायला मिळेल तर गणेश जयंतीला श्री गणेशावर हा सुर्य किरणोत्सव पहायला मिळणार आहे. असा अद्भुत आणि अलौकिक किरणोत्सव अभिषेक वर्षातून तीन वेगवेगळ्या मूर्तींवर पाहायला मिळणारी ही कदाचित एकमेव घटना असावी असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे
तरी या किरणोत्सो अभिषेकाचा तालुक्यातील व जिल्ह्यातील शिवभक्तांनी व आगामी काळात होणाऱ्या किरणोत्सवाचा गणेशभक्त व हनुमान भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मारुती देवस्थान ट्रस्ट तीर्थक्षेत्र निरगुडे च्या सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
COMMENTS