विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, विद्यार्थी ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर, विद्यार्थी विकास मंडळ व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रीन केमिस्ट्री या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. संजय शिवाजीराव काळे यांचे विशेष मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्र.प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे यांनी भूषवले तर उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे व अध्यक्ष प्रतिनिधी व्ही. बी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यशाळेत डॉ. योगेश्वर काळदंते व डॉ. मेजर सुषमा कदम यांनी विद्यार्थ्यांना ग्रीन केमिस्ट्री या विषयावर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सचिन कसबे, रसायनशास्र विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्र विभागप्रमुख प्रा. संतोष काळे, सूत्रसंचालन प्रा. आरती बोरकर व प्रा. गीतांजली गाढवे आणि आभार प्रदर्शन प्रा. तंजीला शेख यांनी केले.
COMMENTS