क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे येथील शारदाबाई पवार विद्यालयातील राष्ट्रीय दुर्बल घटक परिक्षेमध्ये पवा...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण ता. जुन्नर जि. पुणे येथील
शारदाबाई पवार विद्यालयातील राष्ट्रीय दुर्बल घटक परिक्षेमध्ये पवार विद्यालयातील
पाच विद्यार्थी या परिक्षेत बसले होते, त्यापैकी, साक्षी अंबादास वाघमारे व श्रेया
बाजीराव गायकर या विद्यार्थींनींनी या परिक्षेमध्ये यश संपादन केले.
तालुक्यातील ग्रामीण भागातील या विद्यार्थींनी या परिक्षेत
बाजी मारल्यामुळे आंबेगव्हाण व परिसरातून त्यांचे कौतूक होत आहे.
या परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना या विद्यालयाचे वर्गशिक्षक
महादेव डिसले, काशिनाथ वाकचौरे यांनी अनमोल मार्गदर्शन केले.
अशा प्रकारची माहिती या विद्यालयाचे मुख्याध्यापक माणिक
बोऱ्हाडे यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थीनींचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले, तसेच
पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
COMMENTS