सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ ...
सहसंपादकः- प्रा. प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट, बेल्हे (बांगरवाडी) या व्यवस्थापन शास्त्र (एम बी ए ) महाविद्यालयामध्ये समुपदेशन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरणे,प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी लागणारी विविध कागदपत्रे त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रम याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते.
महा-एमबीए /एमएमएस-सीईटी-२०२३ जाहीर सूचना नुकतीच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा-एमबीए/एमएमएस-सीईटी २०२३ प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे यासाठी दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ ते ४ मार्च २०२३पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://mbacet2023.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.१८ व १९ मार्च २०२३ रोजी विविध केंद्रावर हि परीक्षा घेतली जाणार आहे.तरी एम बी ए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच ऑनलाईन अर्ज भरावेत असे समर्थ एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत यांनी सांगितले आहे.
एम बी ए प्रवेशप्रक्रिया व अधिकच्या माहितीसाठी डॉ.महेश भास्कर-९७६६११७८७१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS