विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले (सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील होतकरु , आदिवासी व गरीब १७ विद्यार्थ्याना मेटारोल...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले (सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील होतकरु , आदिवासी व गरीब १७ विद्यार्थ्याना मेटारोल इस्पॅट कंपनीच्या माध्यमातून कार्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR ) फंडातून एकूण ८५ हजार रुपयाचे वाटप दि ८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात करण्यात आले. या शिष्यवृत्ती प्रदान समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ डी व्ही उजगरे हे होते. तर प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी व मेटारोल कंपनीचे अधिकारी श्री राम शिंगणे, श्री शुभम झालटे व श्री अजित जोशी, श्री विनय वाबळे, श्री राहुल गोंधळे, श्री संतोष नवले तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागाचे प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ एम बी वाघमारे म्हणाले की, महाविद्यालयातील गरीब , आदिवासी व होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सामाजिक जाणीवेतून समाजाचे ऋण फेडण्यासाठी मेटोरोल कंपनीचा हा उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे. मेटारोल कंपनीचे अधिकारी श्री राम शिंगणे यांनी CSR फंडाच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करून आम्ही आमची सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. या आर्थिक मदतीचा आधार घेऊन मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे व आपली स्वप्न पूर्ण करावीत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माजी विद्यार्थी व उद्योजक विनय वाबळे यांनी ही आर्थिक मदत आपल्या महाविद्यालयाच्या गरिब विद्यार्थ्याना देत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ उजगरे म्हणाले की, मेटारोल कंपनीच्या वतीने १७ विद्यार्थ्यांना ८५ हजार रुपयाचे प्रत्येकी ५ हजार रु प्रमाणे चेक द्वारे वाटप करण्यात आले. म्हणून या विशेष योगदानासाठी महाविद्यालयाच्या वतीने कंपनीच्या अधिकारी वर्गाचे व मेटारोल कंपनीचे आभार त्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲॅड . संजय शिवाजीराव काळे यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले . या शिष्यवृत्ती समारंभातील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा डी डी कुलकर्णी यांनी केले . तर सूत्रसंचालन कु. श्रृती फदाले व कार्यक्रमाचे आभार कु. आरती काळे यांनी मानले .
COMMENTS