क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील शिवशंकराचे आराध्य दैवत असून या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथील शिवशंकराचे आराध्य दैवत असून या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी विणा पुजन सकाळी १० वाजता श्री. मधुकरशेठ काठे ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ ) यांच्या हस्ते करत अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. शुक्रवारी ह. भ. प. माधव महाराज जाधव ( कल्याण ) यांचे किर्तन होणार आहे, जागर हनुमान प्रासादिक भजन मंडळ सुराळे यांचा होणार आहे.
दुसऱ्या दिवसाची म्हणजेच शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी ह. भ. प. भरत महाराज थोरात ( खेड ) यांचे किर्तन होणार असून महाशिवरात्रीनिमित्त दु. १२ ते ३ वा पर्यंत वरसुबाई भजनी मंडळ हिवरे पठार ( गावठाण ) यांचे भजन होणार आहे, व रात्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ इंगळूण यांचा जागर होणार आहे.
रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ सकाळी ९ ते ११ ह. भ. प. रामकृष्ण महाराज चौधरी ( शिर्डी ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याचा महाप्रसाद मधुकरशेठ काठे यांच्या माध्यमातून होणार आहे.
व्यवस्थापकः- समस्त ग्रामस्थ मंडळ मौजे बोतार्डे, दत्तमंदिर, जनसेवा आदिवासी नवतरूण मंडळ, मोरया प्रतिष्ठाण बोतार्डे, गवळीश्वर तरूण मंडळ, आमलेवाडी, सर्व महिला बचत गट बोतार्डे व मुंबईकर, पुणेकर मंडळी ता. जुन्नर जि. पुणे.
COMMENTS