क्राईमनामा Live : गिरीजा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश बिडवई, तर उपाध्यक्षपदी दीपक कोकणे, सचिव पदी राजेंद्र ताम्हणे तर खजिनदारपदी भारत शेटे ...
क्राईमनामा Live : गिरीजा पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश बिडवई, तर उपाध्यक्षपदी दीपक कोकणे, सचिव पदी राजेंद्र ताम्हणे तर खजिनदारपदी भारत शेटे यांची बिनविरोध निवड
दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या मासिक मीटिंगमध्ये ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी कामकाज पाहिले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गिरीजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सन २०२३ ते २८ साठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये गिरीजा संस्थापक पॅनलचा एक हाती दणदणीत विजय झाला. सर्वसाधारण गटातील आठ जागांसाठी निवडणूक लागली होती. तर चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. सर्वसाधारण गटातील आठ जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. गिरीजा संस्थापक पॅनलचे आठही उमेदवार बहुसंख्य मताने निवडून आले. त्यामध्ये राजेश बिडवई, दीपक कोकणे, राजेंद्र ताम्हाणे, भारत शेटे, सदाशिव ताम्हणे, तुकाराम बिडवई, गणेश गाडेकर व विश्वनाथ शेटे तसेच बिनविरोध निवडून आलेले जितेंद्र बिडवई, विश्वनाथ काळे, लिलाबाई काळे व मनीषा बाळसराफ हे सर्व संस्थापक पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने गिरिजा संस्थापक पॅनलची एक हाती सत्ता गिरिजा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेवर आली आहे.
गिरीजा पतसंस्थेची स्थापना सन १९९९ ला झाली असून यावर्षी संस्था रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. संस्थेचे एकूण १७२२ सभासद असून नऊ कोटी चाळीस लाख रुपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. संस्था स्थापनेपासून सतत 'अ' वर्ग मिळाला असून संस्थेने दरवर्षी १२ टक्के लाभांश सभासदांना दिलेला आहे.
COMMENTS