सहसंपादक – प्रविण ताजणे. पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग , जिल्हा विज्ञान अध्यापक संघ पुणे , एमआयटी व माईर्स विश्वशांती गुरुकुल स्...
सहसंपादक – प्रविण ताजणे.
पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग,जिल्हा विज्ञान
अध्यापक संघ पुणे, एमआयटी व
माईर्स विश्वशांती गुरुकुल स्कूल लोणी
काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी
काळभोर ता. हवेली जि. पुणे येथे दिनांक ९, १०, ११
फेबुवारी रोजी ५० वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले असून जिल्हातून
विद्यार्थी, शिक्षक व परिचर अशा विविध गटातून प्रकल्प सहभागी होत आहे.
सदर विज्ञान प्रदर्शना निमित्ताने विविध वैज्ञानिक उपक्रमांचे व
कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
जिल्ह्यातील सर्वच विज्ञान प्रेमींनी व बाल वैज्ञानिकांनी या वैज्ञानिक पर्वणीचा
लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन युवा शास्त्रज्ञ अंकिता
नगरकर यांच्या हस्ते व पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी
सुनंदा वाखारे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास
एकाड यांनी दिली.
COMMENTS