सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी,पुणे येथे इनोव्हेटिव्ह टेक आयडिया अंतर्गत विविध स्पर्धाचे...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी,पुणे येथे इनोव्हेटिव्ह टेक आयडिया अंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या शाखे अंतर्गत घेतल्या गेलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेल्हे (बांगरवाडी) या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाची दोन्हीही पारितोषिके पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
या प्रकल्प स्पर्धेत काजल शिंदे, वैष्णवी गुंजाळ, शाफिया पठाण यांनी प्रा.प्रियांका लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली "रोबोटिक वेहिकल कंट्रोल बाय हॅन्ड गेस्चर युजिंग पी आय सी मायक्रो कंट्रोलर" हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाचा वापर औद्योगिक क्षेत्रामध्ये ट्रॉली कंट्रोल, लिफ्ट कंट्रोल, नेव्हीगेशन म्हणून तसेच मिलिटरी, मेडिकल, बांधकाम क्षेत्र इ.मध्ये केला जाऊ शकतो.
दैनंदिन जीवनात शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी स्वायत्त म्हणून वापरले जाऊ शकते.
बहुउपयोगी असा हा प्रकल्प असून विविध ठिकाणी सहजरीत्या वापर करू शकतो तसेच कमी वीज पुरवठ्यावर देखील हा प्रकल्प कार्यान्वित होतो.
त्याचप्रमाणे प्रिया बांगर, तशरीफ पठाण व प्रतीक काळे यांनी प्रा.दिपाली गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली "आय ओ टी बेस्ट एअर पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टिम" हा प्रकल्प सादर केला.
या प्रकल्पामुळे हवेतील कण किंवा विषारी वायू प्रदूषकांची उपस्थिती त्वरित ओळखली जाऊन स्मार्टफोनवर एकाच वेळी सूचना ट्रिगर केली जाते. त्यानुसार हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यास आणि परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यास मदत होते.
सदर स्पर्धेमध्ये या दोन्हीही प्रकल्पास अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळाले. प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी आणि त्याचा वापर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी करावा असे यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके तसेच प्राचार्य, विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS