ज ळगाव : शहरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात ती...
जळगाव : शहरातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, एकच खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
जळगाव शहरातील एका भागात ही सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्याला आहे. 7 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नितू ऊर्फ जोया राजू बागडे, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार यांनी पीडितेला चाळीसगाव येथे बोलावले होते. पीडिता चाळीसगावला पोहोचल्यानंतर आरोपींनी तिला शितपेयातून गुंगीचे औषध पाजले. तिला वेगवेगळ्या जणांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी पीडितेला तिच्या घरी पाठवले. पुन्हा दहा फेब्रुवारी रोजी आरोपी या मुलीला चाळीसगावला घेऊन गेले. तिथे त्यांनी 23 फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री या मुलीला अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले.
पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलगी आणि आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
COMMENTS