विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नरमधील प्लेसमेंट विभागाने दिनांक २५ फेब्रुवारी ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नरमधील प्लेसमेंट विभागाने दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रेग्ना इंटरनॅशनल लिमिटेड, दमण यांच्यामार्फत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले होते. त्यामध्ये ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना अशी संधी उपलब्ध करून दिल्याने संस्थेचे मा. अध्यक्ष अँड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांचे समाजातून कौतुक होत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना फार्मासुटीकल्स कंपनीमध्ये उत्पादन विभागामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे यांनी विशेष प्रयन्त केले. मुलाखत घेण्यासाठी प्रेग्ना इंटरनॅशनल लिमिटेड चे मा. पलक पंड्या (एच.आर. ऑफिसर), मा. नवनाथ डोंगरे (क्वालिटी अश्यूरन्स हेड), मा. आकाश वर्मा (मॅनेजर, डिजाइन डेवलपमेंट) इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
मा. पलक पंड्या (एच.आर. ऑफिसर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रेग्ना इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी व उत्पादन याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखती साठी शुभेच्छा देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाऊ शकतात असे विधान केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य मा. डॉ. एम. बी. वाघमारे व विज्ञान विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. आर. डी. चौधरी इ. मान्यवर उपस्थित होते. प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. जे. दुशिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन प्रा. गीतांजली गाढवे व प्रा. आरती बोरकर यांनी केले तर आभार प्रा. एस. एम. काळे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी प्रबंधक प्रा. मनीषा कोरे मॅडम, प्लेसमेंट विभाग व रसायन शास्त्र विभागातील प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
COMMENTS