विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) दिनांक 18/2/2023 रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील प्रा.सौ लता गणेश बेळे या शिवजयंती ...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
दिनांक 18/2/2023 रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील प्रा.सौ लता गणेश बेळे या शिवजयंती निमित्ताने आयोजित मराठी बाणा हा कार्यक्रम पाहण्यासाठी शंकरराव बुट्टे पाटील मैदानावर गेल्या होत्या. मराठी बाणा हा कार्यक्रम संपण्याच्या वेळी खुर्चीजवळ पॉकेट पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते पॉकेट त्यांनी हातात घेऊन त्यांची चौकशी केली असता ज्यांचे पाकीट होतं ती व्यक्ती तेथे नव्हती.हे पॉकेट त्यांनी घरी आणले व त्यांचे पती गणेश किसन बेळे यांना दाखविले पॉकेटमध्ये फोन नंबर मिळतो का ते शोधले पण एकही फोन नंबर पॉकेटमध्ये नव्हता.त्यामुळे संबंधित व्यक्तीला शोधण्यास अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत श्री गणेश किसन बेळे यांनी अनेक व्यक्तींना फोन केला असता संबंधित व्यक्ती पिंपरी पेंढार गावची रहिवासी व सध्या राहणार मुंबई ऐरोली असे असल्याचे समजले. संबंधित व्यक्तीचा संपर्क झाला व त्यांचे पॉकेट व त्यामधील पैसे विविध बँकांचे डेबिट कार्ड,एटीएम कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रे श्री निलेश बळवंत वेठेकर यांना संपर्क साधून, ओळख पटवून रिर्टन केले. श्री निलेश वेठेकर यांनी आपले पॉकेट दिल्याबद्दल सौ लता गणेश बेळे, श्री गणेश किसन बेळे यांचे मनापासून खूप खूप आभार मानले. व समाजात अजूनही माणूसकी जिवंत असण्यासाठी अशा प्रामणिक माणसाची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले.
COMMENTS