सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य उपक्रम ज्येष्ठ बंधू - भगिनींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्या...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य उपक्रम
ज्येष्ठ बंधू - भगिनींनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, त्यासाठी स्वतःची दिनचर्या ठरवावी, कुटुंबात आपल्या मनासारखं व्हावं अशी अपेक्षा करू नये, वय वाढल्यामुळे रोग बळावतात, त्यामुळे चिडचिड होते, त्यासाठी योग्य आहार घ्या,सकाळ- संध्याकाळ चालायला जा. प्रतिकारशक्ती वाढेल, ताण- तणावापासून दूर राहून मानसिक आरोग्य संभाळा, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध हृदय व मधुमेह तज्ञ डॉ. सी. जी. कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या आरोग्य शिबिर प्रसंगी जुन्नर येथे व्यक्त केले. जुन्नर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींचा मोफत आरोग्य शिबिर याप्रसंगी डॉ. कुलकर्णी बोलत होते. या आरोग्य महा शिबिरात पंचायत समिती आरोग्य विभाग, जुन्नर ,डॉ.मते हॉस्पिटल नारायणगाव, हिंद लॅब डायग्नोस्टिक सेंटर जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरात लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन, संपूर्ण रक्त तपासणी, कॅल्शियम, रक्त शर्करा, ब्लड प्रेशर, ई.सी.जी. अशा विविध तपासण्या या प्रसंगी करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरात डॉ. मते हॉस्पिटलच्या वतीने डॉ. अमीर खान,ओंकार खांडेकर, रमेश वायकर, पुनम पाटोळे,ललिता गायकवाड, मुळे, हिंद लॅब चे मंगेश साळवे, प्रतीक्षा केदार,सावकार साळवे आदींनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमात डॉ. सी.जी. कुलकर्णी,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे, शिवनेरी जे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग मोडवे, सचिव मारुती चवरे, सहसचिव बबन पाचपुते, ज्येष्ठ मार्गदर्शक कारभारी डुंबरे, बाजीराव भोर, विलास पानसरे , खजिनदार श्रीमती वंदना परदेशी, शहा भाभी आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे यांनी तर शरद हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आभार सहसचिव मारुती चवरे यांनी मानले.
_____________________
शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य प्रत्येक महिन्याला एकत्र येतात.त्या महिन्यातील अनेकांचा वाढदिवस एकत्र साजरा केला जातो, एकत्र जेवण घेतात,व्याख्यान, गप्पागोष्टी, विनोदी कार्यक्रम, हळदी - कुंकू, रक्षाबंधन अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. धार्मिक स्थळ, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. सर्वच ज्येष्ठत्वाचा
आनंद घेतात.
श्री.पांडुरंग मोडवे
अध्यक्ष शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघ, जुन्नर
COMMENTS