विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : दिनांक 8/02/2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे संपन्न झालेल्...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : दिनांक 8/02/2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे संपन्न झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत कु.रिद्धी सुभाष बोपले हिचा 19 वर्षाखालील मुलींच्या 44 ते 46 किलो वजनी गटात पुणे विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला सदर विद्यार्थिनीची छत्रपती क्रीडा संकुल जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली व कुमारी संतोषी संतोष ताम्हाणे या विद्यार्थिनीचा 55 ते 59 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला दोन्ही विजेत्यांचे विद्यार्थिनींचे जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळेसाहेब, संस्थेचे सहसचिव श्री सुभाष शंकरराव कवडे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डी.व्ही.उजगरे, उपप्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. पी.एस.लोढा, पर्यवेक्षक प्रा.एस. ए.श्रीमंते, कार्यालय प्रमुख सौ. एम.डी.कोरे, क्रीडा शिक्षक प्रा. ए. के.बढे, प्रा.एम.एस.बोंबले व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
COMMENTS