औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या एका तरुणीने अवघ्या तीन महिन्यात राहत्या घरी गळफास लावून आत्मह...
औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या एका तरुणीने अवघ्या तीन महिन्यात राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद नगर रोडवरील वाळूज येथे उघडकीस आलीय.
अंजली गौतम (वय 21) असे मयत तरुणीचे नाव आहे.
नेमकी काय आहे घटना?
उपलब्ध माहितीनुसार, अंजली गौतम हिच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले होते त्यानंतर तिची घरची परिस्थिती हलाखीची होती म्हणून तिने एका कोचिंग क्लासमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिची रोहित कारभारी आव्हाड (वय 22 राहणार बजाज नगर) याच्यासोबत मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.
उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेली अंजली आणि महाराष्ट्रातील रहिवासी रोहित यांच्या दोन्ही कुटुंबाकडून या विवाहाला विरोध झाला म्हणून अखेर या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी पळून जाऊन 9 नोव्हेंबर 2022 रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केलेला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिचा नवरा आणि सासरच्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली.
COMMENTS