क्राईमनामा Live : रात्री उशिरा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक बोगी रुळावरून घसरल्या. तीन बोगींनी पे...
क्राईमनामा Live : रात्री उशिरा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की अनेक बोगी रुळावरून घसरल्या. तीन बोगींनी पेट घेतला.
ग्रीसमधून (Greece Train Accident) मोठी बातमी येत आहे.येथे दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या.या घटनेत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 85 हून अधिक जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.घटनास्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात ग्रीक शहर थेस्सालोनिकी आणि लॅरिसा दरम्यान झाला.मालगाडीला पॅसेंजर ट्रेनची धडकवृत्तानुसार, रात्री उशिरा पॅसेंजर ट्रेन आणि मालगाडीची टक्कर झाली.हा अपघात इतका भीषण होता की अनेक बोगी रुळावरून घसरल्या.तीन बोगींनी पेट घेतला.पॅसेंजर ट्रेनमधील प्रवासी मोठ्या संख्येने या अपघाताचे बळी ठरले.आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 85 हून अधिक जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.यापैकी 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.अनेक व्हिडिओही व्हायरल झालेअथेन्सच्या उत्तरेला सुमारे 235 मैलांवर टेम्पीजवळ घडलेल्या या घटनेनंतरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.यामध्ये मदतकार्य कसे सुरू आहे, हे पाहता येईल.स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनेक डबे रुळावरून घसरले'.तीन बोगींना भीषण आग लागली.अग्निशमन विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.किमान 85 जखमी झाले आहेत.
COMMENTS