नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये दारूच्या नशेत असलेल्या पाच युवकांनी बलोनो कारमधून युवतीला काही किलोमीटर फरफटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झाला...
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये दारूच्या नशेत असलेल्या पाच युवकांनी बलोनो कारमधून युवतीला काही किलोमीटर फरफटत नेल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा आता नवीन सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये मुलगी बलेनो कारखाली अडकलेली दिसत आहे आणि कार चालक तिला कारसोबतच ओढून यू-टर्न घेताना दिसत आहे.
सीसीटीव्ही 1 जानेवारीच्या पहाटे 3वाजून 34 मिनिटांचा आहे. कंझावलाच्या लाडपूर गावापासून थोडं पुढे, वाहन यू-टर्न घेत तोसी गावाकडे परत जाताना दिसते. यात गाडीसोबतच तरुणीचा मृतदेहही दिसतो. कारने पुढे गेल्यावर यू-टर्न घेतल्याचे प्रत्यक्षदर्शी दीपकने सांगितले होते. बलेनो कारने या तरुणीला फरफटत नेलं, तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाचे कलम जोडले आहे.
डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल, त्यांनी दारू प्यायली होती की नाही याची पुष्टी करण्यासाठी आरोपींच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. पोस्टमार्टमसाठी बोर्ड तयार करण्याची विनंती करण्यात आली आहे. तीन डॉक्टरांचे पथक शवविच्छेदन करणार आहे. अटक केलेल्या पाच मुलांनी सांगितले की, 'मुलगी गाडीखाली अडकल्याचे आम्हाला समजले नाही.' सध्या, या तरुणांनी मुलीला गाडीसोबत 4-5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची पुष्टी झाली आहे, परंतु दिल्ली पोलीस पुन्हा गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत. आरोपींना जामीन मिळू नये म्हणून दिल्ली पोलीस आपल्या कायदेशीर टीमच्या संपर्कात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS