क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे शनिवार दिनांक ०७ जानेवारी २०२३रोजी विज्ञान महोत्सव आयोजित केला असून जुन्नर तालुका...
क्राईमनामा Live : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे शनिवार दिनांक ०७ जानेवारी २०२३रोजी विज्ञान महोत्सव आयोजित केला असून जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा. अॅड. संजय शिवाजीराव काळे साहेब यांच्या शुभहस्ते सदर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सदर विज्ञान महोत्सवामध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले आहे. जुन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इयत्ता नववी व दहावी तसेच इयत्ता अकरावी व बारावी मधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा हा या विज्ञान महोत्सवाच्या आयोजनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सदर एकदिवसीय विज्ञान महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे निशुल्क प्रवेश तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र. विज्ञान प्रदर्शन हे केवळ प्रदर्शन न राहता तो एक विज्ञान महोत्सव व्हावा या हेतूने हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे. सदर विज्ञान महोत्सवामध्ये संगणकीय सादरीकरण, प्रकल्प/ गणितीय प्रतिकृती, भितीपत्रक निर्मिती स्पर्धा, वकृत्व स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जुन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून सदर उपक्रमांसाठी महाविद्यालयातर्फे भरघोस बक्षिसांचे आयोजन केले आहे प्रकल्प स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकासाठी सुमारे रू. ४००० तसेच द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे रूपए २५००, रू. २०००, व रू. १०००अशी बक्षिसे प्रदान केली जातील त्याचप्रमाणे इतर स्पर्धांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे रु. २००० रु. १५००, रू. १०००, रु. ७५० अशी बक्षिसे प्रदान केली जातील अशी माहिती महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी.व्ही. उजगरे यांनी दिली.
COMMENTS