सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे (सर ) प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकता...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे (सर )
प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका महाविद्यालयामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे,(बांगरवाडी) येथे आयोजित करण्यात आला होता.
वऱ्हाडी मेडिकलचे संस्थापक प्रसिद्ध फार्मसी उद्योजक सुरेश वऱ्हाडी व रायचंद गांधी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, युवा उद्योजक सागर काळे व सतीश कोल्हे, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश वऱ्हाडी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, मेडिकल हा व्यवसाय मानवी सेवा करणारा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये रुग्णसेवा हिच मोठी सेवा असून त्यासाठी सदैव तत्पर असावे लागते आणि हेच मेडिकल व्यवसायाच्या यशाचे गमक असल्याचे सुरेश वऱ्हाडी यांनी सांगितले.
फार्मसिचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये, केमिकल इंडस्ट्री, अन्न व औषध प्रशासन इत्यादी क्षेत्रात संधी मिळतात. प्राध्यापक, ड्रग इन्स्पेक्टर, क्वालिटी अशुरन्स म्हणून नोकरी करू शकता. तसेच स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करता येते. काहीजण फार्मासूटिकल प्रॉडक्टच्या सेल व मार्केटिंगचेही काम करू शकतात.हेल्थ सिस्टीम फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून देखील काम करण्याची संधी मिळते. तसेच विविध खाजगी कंपन्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून देखील अनेक संधी उपलब्ध आहेत.स्वतःचे नवीन प्रोडक्ट तयार करून त्याचे मार्केटिंग करू शकता. त्यासाठीची आवश्यक कागदपत्र आणि इतर बाबींची सखोल माहिती यावेळी वऱ्हाडी यांनी विद्यार्थ्यांना दिली.
मी संशोधन करून तयार केलेल्या नवीन प्रोडक्टमुळे एखादा रुग्ण बरा होतो यासारखे दुसरे मोठे सुख नाही. आपल्यासाठी हि गर्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीच्या काळी या व्यवसायामध्ये असलेल्या अडचणी-समस्या,त्यावर उपाय, त्यातून आलेले चांगले-वाईट अनुभव विद्यार्थ्यांपुढे विशद केले.
विद्यार्थ्यांसाठी यापुढेही अभ्यासक्रम पूरक अनेक उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे वल्लभ शेळके यांनी सांगितले.
औषधनिर्माणशास्त्र शाखेमध्ये १६ प्रकारच्या विविध नोकरीसाठीच्या संधी उपलब्ध असल्याचे प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गिफ्ट व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्वाती अदमाने यांनी, प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार डॉ.संतोष घुले यांनी मानले.
COMMENTS