विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर ) क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी विज्ञा...
विशेष प्रतिनिधी : प्रा.निलेश आमले ( सर )
क्राईमनामा Live : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी विज्ञान महोत्सवाचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखदार पद्धतीने सकाळी ११ वा संपन्न झाला. या विज्ञान महोत्सवाचे उद्घघाटन जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड संजय शिवाजीराव काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री निवृत्तीशेठ काळे यांनी भूषविले. विज्ञान महोत्सवामध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले होते. या विज्ञान महोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी व्ही उजगरे म्हणाले की 'जुन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता ८ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा हा या विज्ञान महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. विज्ञान महोत्सवात एकूण ३७३ विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विज्ञान महोत्सवाचे उद्घाटक व संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे म्हणाले की' ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व शेतकऱ्यांची मुले उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेले पाहिजेत तसेच त्यांनी आपल्या बुद्धी व कौशल्याच्या द्वारे नवनिर्मितीचा ध्यास घेऊन संशोधक वृत्ती आपल्या अंगी जोपासावी व राष्ट्र उभारणीसाठी कार्य करावे. अशी अपेक्षा आपल्या युवापिढी कडून समाजाला आहे .आपल्या भारत देशाला अनेक महान शास्त्रज्ञ व संशोधकांचा वारसा असून तो पुढे सातत्याने कायम चालु ठेवण्याची जबाबदारी आपल्या नव्या पिढीची आहे. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री सुभाषराव कवडे व विश्वस्त ॲड. अविनाश थोरवे तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ एम बी वाघमारे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते व समर्थ कॉलेजचे प्राचार्य डॉ यु बी शेलार व एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा के जी नेटके, प्रबंधक प्रा. एम डी कोरे व पत्रकार हितेंद्र गांधी, प्रा धर्मेंद्र कोरे, प्राध्यापक वर्ग तसेच जुन्नर तालुक्यातील विविध माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक हे बहुसंख्येने या विज्ञान महोत्सवास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही एच सावंत, आभार उपप्राचार्य डॉ. एम बी वाघमारे यांनी केले.
COMMENTS