नाशिक: एका महाविद्यालयीन युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ एका महाविद्यालयीन युवतीचा अपघा...
नाशिक: एका महाविद्यालयीन युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ एका महाविद्यालयीन युवतीचा अपघाती मृत्यू झाला आहे.
प्रियंका नामदेव कोकणे (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
प्रियंका घरातून इगतपुरीच्या दिशेने महाविद्यालयात जाण्यासाठी पायी चालली होती. पायी चालत असताना मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकत होती. पण, जानोरी रेल्वे फाटकाजवळून चालत असताना प्रियंकाच्या कानात हेडफोन होते. गाण्यांचा आवाज मोठा असल्याने तिला रेल्वेचा आवाज ऐकू आला नाही आणि रेल्वेची धडक बसल्याने प्रियंकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मोबाइलवर गाणे ऐकत असल्याने रेल्वेचा आवाज न आल्याने धडक बसून तिचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना परिसरात समजल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
COMMENTS