क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां...
क्राईमनामा Live : समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, बी सी एस चे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत, पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले, गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले, डॉ.बसवराज हातपक्की, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विपुल नवले, प्रा.दिनेश जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.अमोल भोर, सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र समाजासाठी दिशादर्शक असून त्याप्रमाणे जीवनाची मूल्ये आचरणात आणावी असे यावेळी डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, शिक्षणाविषयी अपार प्रेम, एक थोर समाजसुधारक, ज्योतिबांच्या सहचारिणी, एक उत्तम गृहिणी, कवयित्री, लेखिका, वक्तृत्व व भाषण कला अशा प्रकारचे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्व म्हणून सवित्रीबाईंकडे पाहिले जाते. ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली. त्या काळात महिलेला चूल आणि मूल, उंबरठा हीच लक्ष्मण रेषा किंवा मर्यादा अशी परिस्थिती होती.मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम १४ जानेवारी १९४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.
अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील म्हणाले की, आज पुणे विद्यापीठाने देखील सावित्रीबाईंचे कर्तृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विपुल नवले यांनी मानले.
COMMENTS