जुन्नर प्रतिनिधी- जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) आयोजित गावनिहाय प्रश्नांची सोडवणूक मेळावा व जाहिर सत्कार शनिवार दिन...
जुन्नर प्रतिनिधी-
जुन्नर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) आयोजित
गावनिहाय प्रश्नांची सोडवणूक मेळावा व जाहिर सत्कार शनिवार दिनांक २८ जानेवारी
२०२३ रोजी बोतार्डे येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातील तमाम मागासवर्गीय,
अनुसूचित जाती-जमाती व भटके विमुक्त समाजाचे गावनिहाय प्रश्नांची सोडवणूक करणेकामी
हा मेळावा तसेच जुन्नर तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) उपाध्यक्षपदी
सुरेश रघुनाथ खरात यांची नियुक्ती झाल्याबद्दल जाहिर सत्कार समारंभ आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमाची सुरूवात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे
पूजन तसेच संविधान पूजन दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनार्दन मरभळ यांनी केले तर
अध्यक्षनिवड पोपट राक्षे यांची करण्यात आली, अनुमोदन बाळू खरात यांनी दिले.
यानंतर सत्कारमुर्ती सुरेश रघुनाथ खरात यांचा मान्यवरांच्या
हस्ते सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांचा देखील सत्कार यावेळी शाल फुल देऊन करण्यात
आला.
सभेला संबोधित संभाजीराव साळवे यांनी आपल्या बुलंद आवाजात
समाजातील प्रश्न पोटतिडकीने सुटले पाहिजेत यासाठी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले,
दिलीप वाघमारे यांनी सुरेश खरात यांना उपाध्यक्ष पद मिळाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा
दिल्या, शामसुंदर खरात, पोपट सोनवणे, अनिल सोनवणे, महेंद्र मरभळ, तसेच अध्यक्ष पोपट
राक्षे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपटराव राक्षे होते, सदर कार्यक्रमासाठी
संभाजीराव साळवे ( उपाध्यक्ष आर. पी. आय. महाराष्ट्र राज्य ), दिलीप नाईकनवरे ( अध्यक्ष
आर. पी. आय. खेड तालुका ), प्रविण लोखंडे ( युवा अध्यक्ष आर. पी. आय जुन्नर तालुका
) पोपट सोनवणे ( पत्रकार ), सतिश शिंदे ( पत्रकार ), सौ. वंदना डोळस ( सरपंच बोतार्डे
ग्रामपंचायत ), जनार्दन मरभळ ( सदस्य बोतार्डे ग्रामपंचायत ), पांडूरंग डावखर ( माजी.
सरपंच बोतार्डे ), संतोष मरभळ ( सदस्य बोतार्डे ग्रामपंचायत ), सुलोचना मरभळ ( सदस्या ग्रामपंचायत बोतार्डे ), अशोक लवांडे ( पत्रकार
) शामसुंदर खरात ( गायक ), शरद शिंदे, प्रज्वल शिंदे, दिलीप वाघमारे, अनिल सोनवणे,
कुलदिप कोकाटे ( पोलीस पाटिल बोतार्डे ), विश्वासराव मरभळ ( सामाजिक कार्यकर्ते ), मनोहर कोकाटे ( माजी सैनिक, गुलाब आमले, दादाभाऊ मरभळ ( माजी तंटामुक्ती अध्यक्ष
), संजय आमले, विजय पोटे, काशिनाथ रोकडे, चैतन्य घोडे, शिवाजी कोकाटे, सुभाषशेठ मरभळ, हे मान्यवर पाहुणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी जु्न्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी काळे
साहेब, देवाडे साहेब, तलांडे साहेब उपस्थित होते.
या कार्यक्रमाला बोतार्डे गावचे ग्रामस्थ तसेच महिला भगिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सकाळपासूनचे नियोजन बौध्द विकास मंडळाचे
कार्यकर्ते वैभव खरात, प्रतिक खरात, बाळू खरात, बबन शिंदे, सतिश शिंदे यांनी केले.
तसेच जनसेवा आदिवासी मंडळाचे कार्यकर्ते यांनी मोलाची मदत केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतिश शिंदे यांनी केले.
COMMENTS