क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील जि.प.प्राथमिक शाळा बोतार्डे व ग्रामपंचायत येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये...
क्राईमनामा Live : जुन्नर तालुक्यातील बोतार्डे येथील जि.प.प्राथमिक शाळा बोतार्डे व ग्रामपंचायत येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत येथील ध्वजारोहन बोतार्डे गावचे माजी सरपंच पांडूरंग डावखर, माजी सैनिक मोनहर कोकाटे,चंद्रकांत खरात व जि.प.प्राथमिक शाळेचे ध्वजारोहन रोहिदास मरभळ, सुरेश खरात ( RPI उपाध्यक्ष ), पांडूरंग मरभळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर शाळेच्या प्रांगणातील स्टेजवर सभेचे आयोजन करण्यात आले होते, या सभेचे अध्यक्ष अजित आमले यांनी भूषविले तर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.वंदना डोळस, उपसरपंच राहूल आमले, सदस्य जनार्दन मरभळ, संतोष मरभळ, नलिनी तलांडे, रंजना केदार, सौ.हिराबाई मरभळ सुलोचना मरभळ व बहुसंख्येने ग्रामस्थ व आमलेवाडी दत्तमंदिर व बोतार्डे शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य व माजी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी माजी सरपंच पांडूरंग डावखर, माजी ग्रा. पं. सदस्य पोपट मरभळ, कुलदिप कोकाटे ( पोलीस पाटील ), माजी तंटामुक्ती अध्यक्ष दादाभाऊ मरभळ, विजय पोटे, रोहिदास मरभळ, सुभाष मरभळ, पांडूरंग मरभळ, नवनाथ खरात, लक्ष्मण डावखर, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यानंतर सभेला उद्देशून प्रजासत्ताक दिनाविषयी भाषण करण्यात आली.
यावेळी जनार्दन मरभळ ( सदस्य ), बाळू खरात, बाबाजी केदार व सतिश शिंदे ( पत्रकार ) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केली नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित आमले यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागरगोजे सर यांनी केले तर यावेळी आमलेवाडी शाळेचे शिक्षक व जि.प.प्राथमिक शाळा बोतार्डे येथील मॅडम तळपे, अंगणवाडी कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS