औ रंगाबाद : पती नोकरीवर आणि सासूसासरे बाहेर गेल्यानंतर महिलेने दोन वर्षांच्या चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून दिला आणि बेडरूममध्ये जाऊन गळ...
औरंगाबाद : पती नोकरीवर आणि सासूसासरे बाहेर गेल्यानंतर महिलेने दोन वर्षांच्या चिमुकलीला टीव्हीवर कार्टून लावून दिला आणि बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतल्याची धक्कादाय घटना घडली आहे.
काही वेळानंतर चिमुकली आईच्या मृतदेहाजवळ जाऊन रडत होती. हृदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांचेही मन हळहळले.
औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात समोर आली. रुपाली मयूर गायकवाड (वय 20, रा. आनंदनगर गल्ली क्र. 4, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मुलीच्या रडण्याने आवाजाने ही घटना उघड झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मृत रुपालीने पती मयूरसोबत जेवण केले. त्यावेळी ती आनंदी होती. जेवण झाल्यानंतर मयूर नोकरीवर निघून गेला. सासू आणि सासरे देखील दुकानावर गेले. दोन वर्षीय चिमुकली आकांक्षा आणि रुपाली या दोघीच घरात होत्या. दरम्यान रुपालीने वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आकांक्षाला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि ती खाली बेडरूममध्ये आली. बेडरूममध्ये स्कार्फने तिने गळफास घेतला. चिमुकलीला आई दिसत नसल्याने खाली बेडरूममध्ये आली व आईजवळ रडत बसली. चिमुकलीचा रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता रुपालीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली.
पोलिसांना समजल्यानंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह फासावरून खाली उतरवत रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. कारण, घरात कुठलाही वाद नसताना आणि मृत्यूपूर्वी काही काळ आधीच पतीसह आनंदाने जेवण करणाऱ्या रुपालीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS