सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) क्राईमनामा Live : अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेले जिज्ञासा ऑनलाईन राज्यस्तरीय विज्ञा...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
क्राईमनामा Live : अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेले जिज्ञासा ऑनलाईन राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले.
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून दर्जेदार प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल या सी बी एस ई विद्यालयातील सार्थक आहेर व समर्थ शेळके यांनी सादर केलेल्या 'विषमुक्त शाश्वत शेती' या प्रकल्पास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून राष्ट्रीयस्तरासाठी निवड झाल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना आगस्त्या इंटर नॅशनल फाऊंडेशन कडून रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जुन्नर येथे झालेल्या विज्ञान महोत्सव २०२३ मध्ये देखील समर्थ शेळके या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकाविला.
समर्थ शेळके याने तयार केलेल्या वीज निर्मिती प्रकल्पास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२२ मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. निम्न प्राथमिक गटामध्ये स्वराज भास्कर या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक संपादन केला.
महाराष्ट्र राज्यातून इन्स्पायर्ड अवॉर्ड २०२२ साठी निवड झालेल्या एकूण १६४९ विद्यार्थ्यांमध्ये समर्थ गुरुकुल मधील इ.६ वी मध्ये शिकत असलेला प्रणव कडूस्कर या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक असून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर समाजहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी केला तर विज्ञान वरदान असल्याचे मत संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले.
समर्थ शेळके, सार्थक आहेर, प्रणव कडूस्कर व स्वराज भास्कर या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव आणि
कौतुक केले जात आहे.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य सतीश कुऱ्हे, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर तसेच संकूलातील सर्व प्राचार्य विभाग प्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
COMMENTS