पुणेः शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली एका दाम्पत्यावर खुनी हल्ला करणाऱया मारेकरांना पोलिस...
पुणेः शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली एका दाम्पत्यावर खुनी हल्ला करणाऱया मारेकरांना पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
१६/०१/२०२३ रोजी मध्यरात्री ००/४५ वा चे सुमारास फिर्यादी हे त्यांचे राहते घरासमोरील मैदानात झोपले असताना त्यांना ठार मारण्याचे उददेशाने चार जणांनी हातात तलवार, कोयते अशी प्राणघातक हत्यारे घेवून फिर्यादी यांच्यावर खुनी हल्ला करून फिर्यादी यांचे डोक्याचे मध्यभागी तसेच डावे हाताचे दंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांची पत्नी व मुलगा यांनाही त्यांनी पुढे आल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी दिली होती. यानंतर त्या मारेक-यांनी त्यांनी त्यांचेजवळील हत्यारे हवेत फिरवून मोठमोठयाने आरडाओरड करुन, दहशत निर्माण करून ते सर्वजण सोबत आणलेल्या दुचाकीवरून पसार झाले होते. याबाबत तात्काळ शिवाजीनगर पोलिस ठाणे गु.रजि.नं.१७ / २०२३ भा.द.वि. क. ३०७, ५०६, ३४ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३), फौजदारी कायदा (सुधारीत) कायदा २०१३ चे कलम ३ व ७ असा गुन्हा दाखल करण्यात आला होता
शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने व विक्रम गोड पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास पथकातील पोलिस अंमलदार यांनी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून, सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पसार झालेल्या मारेकऱ्यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय रित्या माहिती प्राप्त करून सातत्यपुर्ण तपास केला. दाखल गुन्ह्यातील मारेकरी
१) अनिकेत ऊर्फे दाद्या लक्ष्मण बगाडे (वय २१ वर्ष, रा. एसआरए बिल्डींग शिंदेवस्ती हडपसर पुणे),
२) तुषार कैलास काकडे (वय १९ वर्षे रा. सदर),
३) दिपक ऊर्फे दिपु काकाराम शर्मा (वय १९ वर्षे रा. सदर) आणि एक विधीसंघर्षितीत बालक यांना शिताफिने वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आले आहे. त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी करता जुन्या भांडणाच्या कारणांवरून सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.
सदरची कामगिरी राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, संदीप सिंह गिल्ल, पोलिस उपायुक्त परि ०१, पुणे शहर, सतीश गोवेकर, सहा. पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग, पुणे शहर तसेच शिवाजीनगर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड, सहा. पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद, रणजित फडतरे, आदेश चलवादी, रोहीत झांबरे यांनी केलेली आहे. पुढील अधिक तपास पोलिस उप निरीक्षक सचिन तरडे हे करीत आहेत.
COMMENTS