क्राईमनामा Live : स्पायडर मॅन चा जम्पिंग थरार भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील प्राचीन संस्कृती आणि परंपरा जतन आणि संरक्षण करण्यासाठी...
क्राईमनामा Live : स्पायडर मॅन चा जम्पिंग थरार
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील प्राचीन संस्कृती आणि परंपरा जतन आणि संरक्षण करण्यासाठी समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे (बांगरवाडी) या सी बी एस ई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील चिमुकल्यांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कृतिद्वारे सामाजिक संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, झाशीची राणी, इंदिरा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री, वीर जवान, परी, पोलीस, मिलिटरी मॅन, डॉक्टर, शेतकरी राजा, अभिनेत्री, आदर्श शिक्षक, ट्राफिक सिग्नल चे नियम पाळा हे सांगणारे कपडे परिधान केले होते.
स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे फलक स्वतः तयार केले होते.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यासाठी सदैव तयार राहण्याचे आवाहन देखील सर्वांना केले.
दैनंदिन वापरातील सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा पुरेपूर वापर करून साकारलेल्या संत, साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, पुढारी, अधिकारी यांच्या हुबेहूब व्यक्तीरेखा उपस्थितांना मनापासून भावल्या.
लहान मुलांचा आवडता हिरो म्हणजे स्पायडर मॅन. अशा स्पायडर मॅन चा पेहराव करून चिमुकल्यांनी उंच उड्या जम्पिंग थरार आणि फाईट करत दंगामस्ती करून चांगलीच धमाल केली.
अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी प्रोत्साहित करतात व त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करतात असे यावेळी प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन पूर्व प्राथमिक व प्राथमिक च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने केले.
सूत्रसंचालन राहुल दुधवडे यांनी तर आभार संजीवनी गायकवाड यांनी मानले.
सर्व वेशभूषा परिधान केलेल्या चिमुकल्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत व संकुलातील सर्व प्राचार्यांनी कौतुक केले.
COMMENTS