क्राईमनामा Live : विरणकवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला आविष्काराला ...
क्राईमनामा Live : विरणकवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला आविष्काराला ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. यानिमित्ताने शाळेच्या सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना श्री. कृष्णा बंडू विरणक याच्यांकडून दप्तराचे वाटप करण्यात आले. सकाळी ८ वाजता सरपंच सौ. कांता युवराज विरणक यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले व श्री. बंडू आहिल्यू विरणक यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच मराठी व इंग्रजी भाषेत केलेल्या भाषणांनी सर्वानाच प्रभावित केले. नृत्य व हास्य नाटीका सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सरपंच सौ.कांता विरणक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विठ्ठल तळपे, लक्ष्मण विरणक, इंदूबाई विरणक, बाळू करवंदे सर मुख्याध्यापक राजेंद्र खेत्री सर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS