आरोग्य टिप्स - अनेकजण साखरेचा चहा तर रोज पितात. अनेकांची सुरूवात चहानेच होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का गुळ खाण्याचे खूप फायदे आहेत. गु...
आरोग्य
टिप्स - अनेकजण साखरेचा चहा तर रोज पितात. अनेकांची सुरूवात चहानेच होते. परंतु
तुम्हाला माहिती आहे का गुळ खाण्याचे खूप फायदे आहेत. गुळा इतकेच गुळाचे पाणी
देखील गुणकारी आहे. गुळाचे पाणी बनविण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करा त्यात गुळाचा
तुकडा टाका. हिवाळ्यात तर गुळाचे पाणी जरूर प्यावे. असे केल्याने दिवसभर लागणारी
ऊर्जा शरीराला मिळते. तसेच इतरही काही फायदे आहेत. ते जाणून घेऊया.
·
सांधेदुखी
·
ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास होतो अशा लोकांनी तर गूळाचे सेवन केले
पाहिजे. कारण गूळ खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास दूर होतो. तसेच हाडे मजबूत होतात.
·
हिमोग्लोबिनची कमतरता
·
गुळाचे पाणी प्यायल्याने हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघते. गुळामध्ये लोह
आणि फोलेट असे सत्व असते.
·
रक्त शुद्ध करते
·
गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्त शुद्ध होते. तसेच यकृत शुद्ध करण्यासाठीही
गुळाचे पाणी प्यावे.
·
त्वचेचे आरोग्य
·
गुळाचे पाणी दररोज प्यायला तर तुमची त्वचा सुंदर बनते.
·
वजन कमी करणे
·
ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी आठवड्यातून दोनदा गुळाचे पाणी
प्यावे.
·
रोगप्रतिकारक शक्ती
·
गूळ हा मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि C चा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे गुळ
खावा. गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
COMMENTS