ज ळगाव : एकीकडे राज्यात कडाक्याची थंडी पडत असून त्यात जळगावातील विद्या इंग्लिश मिडीयम या शाळेतील तब्बल ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थंडी...
जळगाव : एकीकडे
राज्यातकडाक्याची थंडी पडत असून त्यात
जळगावातीलविद्या इंग्लिश मिडीयम या
शाळेतीलतब्बल ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना
थंडीतशाळेच्या बाहेर बसवण्यात आलं होतं.
कारण शाळेची फी भरली नव्हती म्हणून. या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे.
करोना काळापासून अनेक कुटुंबांची आर्थिकघडी विस्कटली असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आपल्या पाल्याची फी भरता न आलेल्या पालकांना शाळा चालकांनी चांगलाच मनस्ताप देण्याचा प्रकार सुरु केला असून त्याचाच एक प्रत्यय जळगाव शहरातील विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पाहायला मिळाला आहे.
विद्या इंग्लिश मिडीयमचे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत हजर झाले. मात्र, वर्गात प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना फी भरण्यास सांगण्यात आले आणि ज्यांनी फी भरली नाही. त्यांना वर्गात प्रवेश न देता, शाळेच्या प्रांगणात बसवण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
COMMENTS