आरोग्य टिप्स : सर्वांच्या घरात तुळस असते. त्याची पूजाही केली जाते. तुळशीचं पान खूप आजारांवर रामबाण उपाय ठरते. शिवाय तुळशीच्या पानांचा वापर अ...
आरोग्य टिप्स : सर्वांच्या घरात तुळस असते. त्याची पूजाही केली जाते. तुळशीचं पान खूप आजारांवर रामबाण उपाय ठरते. शिवाय तुळशीच्या पानांचा वापर अनेक आजार बरे करण्यासही होतो. आज आपण जाणून घेऊया तुळशीची पान खाल्ल्याने काय फायदे होतात.
– ज्या लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो अशा लोकांनी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुळशीची पाने खावीत. त्यामुळे सर्दी खोकला, घसा खवखवणे बरे होते.
– तुळशीची पाने खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच तुळशीच्या पानांमुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारखे आजार दूर राहतात.
– पोटाच्या कोणत्याही समस्या जाणवत असतील तर तुळशीची पाने खाण्याचा सल्ला दिला जातो. रिकाम्या पोटी तुळशीची पाने खावीत. त्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या समस्या दूर पळतात.
– तोंडाचा वास येत असेल तर तुळशीची पाने खा. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
– दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.
COMMENTS