जुन्नर प्रतिनिधी गुरूवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला, बोरी खुर्द मध्ये संघर्ष सोशल फाउंडेशन जुन्नर तालुका यांच्यावतीने नुकताच सायकल वाटप कार्य...
जुन्नर प्रतिनिधी
गुरूवर्य एकनाथ गोविंद देव प्रशाला, बोरी खुर्द मध्ये संघर्ष सोशल फाउंडेशन जुन्नर तालुका यांच्यावतीने नुकताच सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी सर्वोन्नती मंडळ बोरी खुर्दचे उपाध्यक्ष लक्ष्मण काळे पाटील, उद्योजक अजित काळे, शास्त्रज्ञ डॉ.सचिन पटाडे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र गणपुले आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संघर्ष फाउंडेशनचे श्रद्धा लेंडे, प्रणिता वाघमारे, प्रतीक खिलारी,संकेत जाधव, विघ्नेश वाळुंज, सौरव सातपुते हे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी फाउंडेशनचे संचालक सुशील महाराज जाधव म्हणाले की संघर्ष फाउंडेशन ही संस्था जुन्नर तालुक्यातील समविचारी मित्रांनी एकत्र येऊन स्थापन केली आणि शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याचे ठरवले. यासाठी फाउंडेशनचे सदस्य वाढदिवसाचा खर्च टाळून तसेच स्वतःच्या मासिक उत्पन्नातील काही रक्कम बचत करून शाळेतील आर्थिक दृष्ट्या गरीब ,गरजू व हुशार विद्यार्थ्यांना सायकल, दप्तर, गणवेश यासारख्या उपयोगी वस्तूंचे वाटप करतात. विद्यार्थ्यांनी या मिळणाऱ्या मदतीचा सदुपयोग करावा असे अवाहन त्यांनी केले. या फाउंडेशनला काही दानशूर व्यक्ती देखील नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर मदत करतात. या कामी प्रशालेचा माजी विद्यार्थी प्राध्यापक संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.
फाउंडेशनच्या वतीने प्रशालेतील वेदांत मंगेश शेटे व शुभम शिवाजी लोकरे या दोन गरीब विद्यार्थ्यांना दोन सायकलचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन धायबर सर यांनी केले तर पटेल सर यांनी आभार मानले.
COMMENTS