आरोग्य टिप्स - वय वाढले की विविध आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच मग आयुष्य व्यतीत करावे लागते. परंतु तुम्हाला माहिती आहे का...
आरोग्य टिप्स - वय वाढले की विविध आजारांचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातच मग आयुष्य व्यतीत करावे लागते. परंतु तुम्हाला माहिती आहे का आपण निरोगी आयुष्यही जगू शकतो. त्यासाठी काही गोष्टी आणि सवयी पाळाव्या लागतात.
जर तुम्हाला वयाच्या 50 व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त दिसायचे
असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता.
चांगले आरोग्य हवे असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा आहार. आहार चांगला असावा. त्यात हिरव्या पालेभाज्या असाव्यात. शरीराला ज्या पोषक तत्त्वांची कमतरता आहे तसा आहार आपण केला पाहिजे. डॉक्टरांचा आवश्यक सल्ला घेतला पाहिजे.
– वजन नियंत्रित ठेवा
दुसरे महत्त्वाचे म्हणजे वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. कारण वजन वाढले तर मधुमेह, हृदयविकार अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रोज व्यायाम, योगाासने करून वजन नियंत्रित ठेवा.
– व्यायाम
निरोगी आरोग्यासाठी तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. व्यायाम हा दररोज न चुकता केलाच पाहिजे. व्यायाम केल्याने शरीर तंदुरूस्त आणि निरोगी राहते. त्यासाठी रोज चालले पाहिजे. तसेच एक ते अर्धा तास रोज व्यायाम केला पाहिजे.
– पुरेशी झोप
आपल्या शरीराला जेवढ्या व्यायामाची गरज असते तेवढीच गरज आरामाचीही असते. त्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे. दररोज सुमारे 7 ते 8 तास झोपं घेणं आवश्यक आहे.
– आवश्यक तेवढे पाणी प्या
शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे फार गरजेचे आहे. त्यासाठी दररोज किमान आठ ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे.
– वैद्यकीय तपासणी
तुमचे वय ३० पार झाले असेल तर तुम्ही नियमित
वैद्यकीय तपासणी केली पाहिजे. असे केल्याने शरीरातील बदल, कमतरता, अतिरेक ओळखून
त्यावर वेळीच उपाय करता येतील.
COMMENTS