ना शिक : राज्यात अपघाता चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच आता खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झ...
नाशिक : राज्यातअपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच आता खाजगी आरामबसआणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये ८ महिला आणि पुरुष तर २ मुलांचा समावेश आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना सिन्नरशिर्डीमहामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ घडलीय. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस आणि शिर्डी कडून सिन्नरकडे जाणारा मालट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या घटनेमुळे पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाका दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.
अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
COMMENTS