प्रतिनिधी – प्रा. शरद मनसुख ( सर ) जुन्नर ता २३."श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील "राष्ट्रीय सेवा योजना" या विभागाच्या वत...
प्रतिनिधी – प्रा. शरद मनसुख ( सर )
जुन्नर ता २३."श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील "राष्ट्रीय सेवा योजना" या विभागाच्या वतीने दातखिळेवाडी येथे २१.डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२२. या सात दिवशीय शिबिराच्या तिसऱ्या दिवशी नव मतदार नोंदणी व आधार लिंक हा उपक्रम राबविण्यात आला. त्याच बरोबर दुपार सत्रातील कार्यक्रमाचे व्याख्याते जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रांत अधिकारी मा. श्री सारंग कोडोलकर यांनी आपल्या व्याख्यानात नव मतदार नोंदणी, आधार कार्ड लिंक, ई-पीक पाहणी व इतर शासकीय योजनांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. तसेच जुन्नर तालुका नायब तहसीलदार मा.श्री राहुल कोटकर यांनीही शासकीय योजनान बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दिपेंद्र
उजगरे यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी, नव मतदार नोंदणी,आधार
लिंक, जन-धन योजना, आभा कार्ड, संजय गांधी
निराधार योजना, या योजनान बद्दल माहिती देऊन ही कामे 100% महाविद्यालयातील स्वयंसेवक
करतील असे आश्वासन मा.प्रांत साहेबांना दिले,
या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ या
संस्थेचे अध्यक्ष मा. अँड. संजय काळे
साहेब, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.दीपेंद्र उजगरे, उपप्राचार्य
डॉ.महादेव वाघमारे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी सरपंच श्री राहुल दातखिळे
उपसरपंच श्री.विकास दातखिळे यांचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम रसाळ ,प्रा. स्वप्निल घोडेकर, प्रा. मयूर चव्हाण,प्रा. सौ अनिशा दुरापे , कु. अंकिता वाळुंज व शिबिरातील सर्व स्वयंसेवक यांनी केले.
COMMENTS